Ad will apear here
Next
श्रीदेवीदर्शन
आदिमाया, आदिशक्ती अशी देवीची अनेक रूपे आहेत. माणसाला जगण्याचे बळ तिच्या आराधनेतून मिळते, अशी भावना आहे. ‘श्रीदेवीदर्शन’ या पुस्तकातून डॉ. सीताराम गणेश देसाई यांनी देवीच्या उपासनेबद्दल मार्गदर्शन केले आहे. उपासना कशी करावी, का करावी आणि ती केल्यास काय फळ मिळते, याचे विवेचन यात केले आहे. पुस्तकात सुरुवातीला सप्तशतीच्या कथा सांगितल्या आहेत. सुरथ राजा, समाधी वाणीची गोष्ट, महामायेची कथा, शुंभ-निशुंभाचा वध, देवीचरित्र पठणाचे महात्म्य अशा १५ कथा आहेत. नंतर श्री दुर्गा सप्तशती आणि पाठविधी, श्री देवी अथर्वशीर्ष अथवा देव्युपनिषद, ध्यानश्लोकसंग्रह, देवीचे प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्तिरहस्य, सप्तशतीचे काही सिद्ध संपुटमंत्र, शारदीय नवरात्र, नवरात्री उत्सव गीत, आरती, व्रते, श्रीसूक्त, देवीची अष्टोत्तरशत नामावली, देवीची उपनिषदे, देवीची १५ तीर्थक्षेत्रे, भारतातील देवीक्षेत्रे, देवीचे सण, प्रभावी देवीस्तोत्रे या पुस्तकात आहेत. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या विधीचीही माहिती यात दिली आहे.

पुस्तक : श्रीदेवीदर्शन
लेखक : डॉ. सीताराम ग. देसाई
प्रकाशन : पंचतत्त्व प्रकाशन
पृष्ठे : २०१
मूल्य : १५०

(‘श्रीदेवीदर्शन’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZOIBW
Similar Posts
रिकामा कॅनव्हास भारतीय स्त्रीची प्रतिमा पूर्वीपासून सहनशील, आज्ञाधारक, कुटुंबवत्सल अशी आहे. या प्रतिमेतील स्त्रीचे दर्शन अमृता प्रीतम यांच्या 'रिकामा कॅनव्हास' या कथासंग्रहातून दिसते. मात्र, या कथा स्त्रीवादी असल्या तरी यातील स्त्री कुमकुवत नाही, परीस्थितीचे रडगाणे न गाता त्यावर मत करून धैर्यशीलतेचे दर्शन घडविणारी आहे
पोटली परदेशात राहणारे भारतीय ही आता नवीन गोष्ट राहिली नसली, तरी अद्याप त्यांच्या विषयीचे कुतूहल कायम आहे. कारण त्यांना येणाऱ्या अनुभवांचे वेगळेपण आणि त्यांचे आचार-विचार हे त्या कुतूहलास कायम आहे. कारण त्यांना येणाऱ्या अनुभवांचे वेगळेपण आणि त्यांचे आचार-विचार हे त्या कुतूहलास कारणीभूत ठरतात. दुबई-अबुधाबी आणि
बालशिक्षणाच्या अध्वर्यू ताराबाई मोडक भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ आणि ज्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यामुळे भारतात शिशुविहार सुरू झाले, ती कर्तृत्ववान स्त्री म्हणजे ताराबाई मोडक. ‘नवरत्ने’ मालिकेत आज ताराबाईंच्या कामाबद्दल...
ऑनलाइन बँकिंगच्या जगात + ऑनलाईन शॉपिंगच्या जगात सध्याच्या संगणक युगात ऑनलाईन बँकिंग व्यवहाराची सुविधा देशातील बहुतेक बँकांनी दिली. या प्रक्रियेलाच 'नेटवर्किंग' म्हणतात. या सुविधेमुळे खातेदाराला २४ तास व आठवड्याचे सर्व दिवस व्यवहार करता येतात. हे सर्व कसे कारावे याविषयी 'ऑनलाईन बँकिंगच्या जगात'मधून नरेंद्र आठवले व सुजाता आठवले यांनी मार्गदर्शन केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language